मुंबईची हवाई हद्द चार दिवस एक तासासाठी बंद!

मुंबईची हवाई हद्द ११, १२, १३ व १४ जानेवारी रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत बंद राहणार
मुंबईची हवाई हद्द चार दिवस एक तासासाठी बंद!

मुंबई : भारतीय हवाई दलातर्फे विमानांच्या कवायती मरीन ड्राईव्ह किनाऱ्यावर सादर होणार आहेत. त्यामुळे मुंबईची हवाई हद्द ११, १२, १३ व १४ जानेवारी रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावर येणाऱ्या व जाणाऱ्या विमानांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे, असे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या प्रवक्त्याने सांगितले. त्यामुळे प्रवाशांनी त्यांच्या विमानाचे वेळापत्रक पाहून निघावे, असे आवाहन केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in