मुंबईकडे येणाऱ्या पवन एक्सप्रेसला आग ;खिडक्या फोडून प्रवाशांची सुटका

खिडकी तोडून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. बोगीतून बाहेर आल्यानंतर प्रवाशांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती.
मुंबईकडे येणाऱ्या पवन एक्सप्रेसला आग ;खिडक्या फोडून प्रवाशांची सुटका
PM
Published on

पाटणा : बिहारमधील मधुबनी येथील जयनगर येथून मुंबईकडे येणाऱ्या पवन एक्स्प्रेसच्या वातानुकुलित टू टायर डब्याला आग लागली. मात्र, कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधनामुळे शॉर्टसर्किटमुळे लागलेली आग वेळीच आटोक्यात आली आहे. या गाडीची सुटण्याची वेळ १ वाजता होती. खिडकी तोडून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. बोगीतून बाहेर आल्यानंतर प्रवाशांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती.

पवन एक्सप्रेस ही ट्रेन मुंबईच्या दिशेने जाते आणि जयनगरला पोहोचल्यावर प्लॅटफॉर्मवर उभी राहते. जयनगरमध्ये फक्त पाणी भरणे आणि साफसफाई केली जाते. त्यानंतर मूळ धुलाई व स्वच्छता मुंबईत होते. शुक्रवारी मधुबनी येथे या रेल्वेच्या वातानुकुलित डब्ब्याला आग लागली. सध्या घटनेनंतर विद्युत तपासणी झाली की नाही, याबाबत अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.

logo
marathi.freepressjournal.in