मुंबई - मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस २८ जूनपासून प्रवाशांच्या सेवेत

पावसाळ्यानंतर ही ट्रेन हे अंतर ७ तास १५ मिनिटांत पार करणार आहे
मुंबई - मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस २८ जूनपासून प्रवाशांच्या सेवेत

आता कोकण प्रवास अधिका सुंदर होणार असून मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस २८ जून पासून सेवा देण्यासाठी सज्जा झाली आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं गोवा आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई अशा दोन शहरांदरम्यान जलद, सुखकर आणि सुरक्षित प्रवास प्रदान करणार आहे. ही एक्स्प्रेस २८ जून पासून पावसाळ्यात आठवड्यातून तीन दिवस आणि १ नोव्हेंबरपासून शुक्रवार वगळता आठवडाभर चालेल. ही ट्रेन एकूण आठ डब्यांची असेल. उद्दघाटनानंतर ही ट्रेन मडगावहून मुंबई २७ जून रोजी निघेल २८ जूनपासून मुंबईमधून नियमीत सेवेत असणार आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पावसाळ्यात सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पहाटे 5:25 वाजेला सुटेल. ही गाडी त्याच दिवशी दुपारी साडेतीन वाजेला मडगाव पोहचेल. तसंच परतीच्या दिशेने ही गाडी मंगळवार, गुरुवार आणि शनिवार दुपारी 12:20 वाजता मडगावहून सुटेल आणि रात्री १०:25 वाजेला सीएसएमटीला पोहचेल.

मडगावप ते सीएसएमटी दरम्यानचं ५८६ किमी अंतर कापण्यासाठी प्रवाशांना सध्या सुमारे ११-१२ तास प्रवास करावा लागतो. मात्र, वंदे भारत एक्स्प्रेने पावसाळ्यात हे अंतर १० तासांचा असणे अपेक्षित आहे. पावसाळ्यानंतर ही ट्रेन हे अंतर ७ तास १५ मिनिटांत पार करणार आहे. ही ट्रेन मुंबईत सीएसएमटी येथून निघाल्यानंतर दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम या थांब्यांवर थांबणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in