मुंबईचा आर. के. शिशिर देशात पहिला

आयआयटी दिल्ली विभागात तनिष्का काबरा हिने महिलांमध्ये पहिला क्रमांक मिळवला.
मुंबईचा आर. के. शिशिर देशात पहिला

भारतीय प्रौद्योगिकी संस्था, बॉम्बेने घेतलेल्या ‘जेईई अॅडवान्स’ २०२२ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून मुंबईच्या आर. के. शिशिरने पहिला क्रमांक पटकावला आहे. आयआयटी दिल्ली विभागात तनिष्का काबरा हिने महिलांमध्ये पहिला क्रमांक मिळवला.तर अखिल भारतीय पातळीवर तिला १६वा क्रमांक मिळाला. आर. के. शिशिरला या परीक्षेत ३६० पैकी ३१४ गुण मिळाले, तर तनिष्का काबरा हिला ३६० पैकी २७७ गुण मिळाले. आयआयटी मद्रासच्या पल्ली जलजाक्षीने २४वा क्रमांक तर जलाधी जोशीने ३२वा क्रमांक मिळवला. या परीक्षेत १० जणांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. त्यात आर. के. शिशिर, वांगपल्ली साई सिद्धार्थ, पॉलिसेटी कार्तिकेय, दायला जॉन जोसेफ, लवेश महार, ओजस माहेश्वरी, गायकोटी विग्नेश, ओंकार रमेश शिरपूर, ताद सिमीपूर आदींचा समावेश आहे. जेईई अॅडवान्स २०२२मध्ये पेपर-एक व दोनमध्ये १,५५,५३८ जण परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४०,७१२ जण ही परीक्षा उत्तीर्ण झाले. यात ६,५१६ महिलांचा समावेश आहे. या परीक्षेतील यशस्वी उमेदवार काउन्सिलिंगसाठी अर्ज करू शकतात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in