मुंबईच्या ट्रॅफिक जॅमने पटकावला जगात तिसरा क्रमांक

मुंबईत १२१ तास ट्रॅफिक जॅम झाले असून, गर्दीचा दर ५३ टक्के इतका राहिला आहे.
 मुंबईच्या ट्रॅफिक जॅमने पटकावला जगात तिसरा क्रमांक

ट्रॅफिक जॅमची समस्या आता पावलोपावली जाणवू लागली आहे. वर्षाला सर्वाधिक वाहतूककोंडी होणाऱ्या जगातील शहरांमध्ये आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईने मुसंडी मारली आहे. ट्रॅफिक जॅमच्या बाबतीत मुंबईने जगात तिसरा क्रमांक पटकावला असून, भारतातील तीन शहरे जगातील अव्वल सहा शहरांमध्ये समाविष्ट झाली आहेत.

जगात सर्वाधिक ट्रॅफिक होणाऱ्यांमध्ये तुर्कीच्या इस्तंबुल शहराने अग्रस्थान पटकावले असून वर्षातून तब्बल १४२ तास म्हणजेच जवळपास सहा दिवस या शहराने ट्रॅफिकमध्ये घालवले आहेत. कोलंबियाच्या बोगोटा शहरामध्ये २०२१ साली १२६ तास ट्रॅफिक जॅम झाले असून हे शहर जगात दुसऱ्या स्थानी आहे. मुंबईत १२१ तास ट्रॅफिक जॅम झाले असून, गर्दीचा दर ५३ टक्के इतका राहिला आहे.

विशेष म्हणजे, २०१९च्या तुलनेत यंदा ट्रॅफिक जॅममध्ये १२ टक्क्यांनी घट झाली आहे. याच यादीत भारतातील बंगळुरू आणि नवी दिल्ली ही दोन शहरे संयुक्तपणे पाचव्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही शहरांमध्ये वर्षाला प्रत्येकी ११० तास ट्रॅफिक जॅमची नोंद झाली आहे. रोमानिया देशातील बुचारेस्ट शहराने ११५ तास ट्रॅफिक जॅमसह चौथे स्थान प्राप्त केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in