दिल्ली पुन्हा हादरली ! मोबाईल फोन केबलच्या सहाय्याने गळा आवळून खून, मृतदेह ढाब्याच्या फ्रिजमध्ये

साहिल आणि निक्की दिल्लीतील द्वारका भागात 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहत होते. साहिलने आपल्या कुटुंबीयांना...
दिल्ली पुन्हा हादरली ! मोबाईल फोन केबलच्या सहाय्याने गळा आवळून खून, मृतदेह ढाब्याच्या फ्रिजमध्ये

दिल्लीत (Delhi) पुन्हा एकदा श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली आहे. एका तरुणाने प्रेयसीची हत्या करून मृतदेह ढाब्याच्या फ्रीजमध्ये ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर या हत्येनंतर तरुणाने दुसऱ्या तरुणीसोबत लग्न केले. प्रेयसीने लग्नाला विरोध केल्याने ही हत्या झाल्याचे तपासात उघड झाले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. निक्की यादव (Nikki Yadav) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर, साहिल गेहलोत (२३) असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी तरुण साहिल गेहलोत याला अटक केली आहे. साहिल हा मित्राव गावचा रहिवासी आहे. तर, निक्की ही हरियाणातील झज्जरची रहिवासी होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना साहिल आणि निक्की यांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर साहिल आणि निक्की दिल्लीतील द्वारका भागात 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहत होते. साहिलने आपल्या कुटुंबीयांना त्याच्या प्रेमप्रकरणाची माहिती दिली नसल्याने घरच्यांनी साहिलचे लग्न दुसऱ्या तरुणीसोबत लावले. ही माहिती मिळाल्यानंतर निक्की साहिलला काश्मिरी गेटजवळ भेटायला बोलावले. त्यानंतर चर्चेदरम्यान दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. या वादातूनच साहिलने कारमधील मोबाईल फोन केबलच्या सहाय्याने निकीचा गळा आवळून खून केला. हत्येनंतर साहिलने तिचा मृतदेह मित्राव गाव परिसरातील ढाब्याच्या फ्रिज मध्ये लपवून ठेवला. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in