ज्ञानवापी तळघराच्या सर्वेक्षणास मुस्लीम पक्षाचा विरोध; मशिदीला हानी पोहोचण्याच्या शक्यतेचे कारण

विश्व वेदिक सनातन संघाच्या संस्थापक सदस्य राखी सिंग यांनी या सर्वेक्षणासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
ज्ञानवापी तळघराच्या सर्वेक्षणास मुस्लीम पक्षाचा विरोध; मशिदीला हानी पोहोचण्याच्या शक्यतेचे कारण

लखनऊ : ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात असलेल्या बंद तळघराचे आर्केलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया अर्थात एएसआयद्वारे सर्वेक्षण करण्यास यामुळे मशिदीस हानी पोहोचू शकते असे कारण पुढे करून मुस्लीम पक्षाने विरोध दर्शवला आहे. मंगळवारी या विषयावरील याचिका वाराणसी न्यायालयात सुनावणीस आली. तेव्हा प्रभारी जिल्हा न्यायाधीश अनिल कुमार यांनी या विषयावरील पुढील सुनावणी येत्या १५ फेब्रुवारी रोजी होर्इल, असा निर्वाळा दिला असल्याची माहिती वकील मदन मोहन यादव यांनी दिली आहे.

विश्व वेदिक सनातन संघाच्या संस्थापक सदस्य राखी सिंग यांनी या सर्वेक्षणासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेनुसार या ठिकाणी गुप्त तळघरे असून ज्ञानवापी मशिदीचे पूर्ण सत्य उघड होण्यासाठी या तळघरांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. यामुळे सिंग यांनी आपल्या याचिकेच्या माध्यमातून ज्ञानवापी मशीद संकुल आणि लागून असलेल्या काशिनाथ विश्वनाथ मंदिरातील सर्व बंद तळघरे उघडून सर्वेक्षण करावे, असे वकील अनुपम द्विवेदी यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in