...त्यापेक्षा मृत्यू पत्करेन; न्यायाधीशांचे वक्तव्य

हुंड्यासाठी पत्नीची जिवंत जाळून हत्या करणाऱ्या एका आरोपीला फाशीची शिक्षा सुनावताना न्यायाधीश रवी कुमार दिवाकर म्हणाले, माझ्या पालकांनी मला फक्त देवाला घाबरायला शिकवले आहे, इतर कोणालाही...
...त्यापेक्षा मृत्यू पत्करेन; न्यायाधीशांचे वक्तव्य
...त्यापेक्षा मृत्यू पत्करेन; न्यायाधीशांचे वक्तव्य
Published on

मुझफ्फरनगर : माफिया, गुंड किंवा गुन्हेगारांच्या दबावाखाली मी माझे न्यायालयीन काम करणार नाही. भित्रा न्यायाधीश म्हणून जगण्यापेक्षा मी मृत्यू पत्करेन, असे वक्तव्य मुझफ्फरनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (फास्ट ट्रॅक कोर्ट) रवी कुमार दिवाकर यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. हुंड्यासाठी पत्नीची जिवंत जाळून हत्या करणाऱ्या एका आरोपीला फाशीची शिक्षा सुनावताना त्यांनी हे विधान केले. गेल्या चार महिन्यांत त्यांनी दिलेली ही २३ वी फाशीची शिक्षा आहे.

निकालपत्रात आपल्या भावना व्यक्त करताना न्यायाधीश दिवाकर म्हणाले, माझ्या पालकांनी मला फक्त देवाला घाबरायला शिकवले आहे, इतर कोणालाही नाही. जर मी गुंड, माफिया किंवा गुन्हेगारांच्या भीतीपोटी न्यायदान केले, तर सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल. मी माझ्या तत्त्वांवर ठाम राहूनच माझे कर्तव्य बजावत राहीन.न्या. दिवाकर यांनी आपणास माफिया आणि गुन्हेगारांकडून सातत्याने धमक्या येत असल्याचे सांगितले. तसेच माफिया आणि गुन्हेगारांचे भले करण्यासाठी आपल्या न्यायालयातील सुमारे १०० गंभीर खटले इतरत्र वर्ग करण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in