मिझोराममध्ये म्यानमारच्या लष्कराचे विमान दुर्घटनाग्रस्त; सहा जखमी

जखमींना लेंगपुई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे विमान भारतातून आपले सैनिक परत नेण्यासाठी आले होते.
मिझोराममध्ये म्यानमारच्या लष्कराचे विमान दुर्घटनाग्रस्त; सहा जखमी

ऐझवाल : म्यानमार सैन्याचं विमान मिझोराम विमानतळावरील रनवेवरून घसरल्यामुळे झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. या विमानात पायलटसह एकूण १४ प्रवासी होते.

जखमींना लेंगपुई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे विमान भारतातून आपले सैनिक परत नेण्यासाठी आले होते. प्राप्त माहितीनुसार, लेंगपुईमधील टेबल टॉप रनवे या दुर्घटनेला कारणीभूत आहे. कारण हा रेनवे देशातील सर्वात धोकादायक लँडिंग भागापैकी एक आहे. सैनिकांनी म्यानमार वायुसेनेच्या विमानातून लेंगपुई विमानतळावरून सितवेपर्यंत पाठवले. अन्य ९२ सैनिकांना आज परत पाठवले जाणार होते. भारताने सोमवारी १८४ म्यानमार सैनिकांना त्यांच्या देशात परत पाठवले होते. हे सैनिक मागच्या आठवड्यात एका जात समूहावर केलेल्या गोळीबारानंतर आपल्या देशातून पळून मिझोराममध्ये आले आहेत. आठवड्यात म्यानमारचे २७६ सैनिक मिझोराममध्ये आले होते.

logo
marathi.freepressjournal.in