ओदिशा अपघातग्रस्तांसाठी कॉनमॅन सुकेशने देऊ केले १० कोटी रुपये

सुकेशने अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी आपल्याला परवानगी द्यावी, अशी मागणीही रेल्वेमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली
ओदिशा अपघातग्रस्तांसाठी कॉनमॅन सुकेशने देऊ केले १० कोटी रुपये
Published on

२०० कोटींच्या मनी लाँड्रिंगप्रकरणी दिल्लीच्या मंडोली तुरुंगात अटकेत असलेला कुप्रसिद्ध कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर याने ओदिशा रेल्वे दुर्घटनाग्रस्तांना मदत म्हणून १० कोटी रुपये देऊ करण्याची तयारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना एका पत्राद्वारे केली. ही रक्कम वैध असून करयोग्य उत्पन्नातील असल्याचेही त्याने नमूद केले आहे.

सुकेशने अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी आपल्याला परवानगी द्यावी, अशी मागणीही रेल्वेमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. ही रक्कम माझ्या वैयक्तिक फंडातील असून ती वैध उत्पन्नातील आहे, असे सांगत यासोबत आवश्यक कागदपत्रे आपण सादर करू, असे त्याने म्हटले आहे.

यापूर्वी, तुरुंग महासंचालकांना पत्र पाठवून सुकेशने आपल्या वाढदिवसानिमित्त तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या कल्याणासाठी ५ कोटींची देणगी देण्याची ऑफर दिली होती.

logo
marathi.freepressjournal.in