नड्डांची भाजप प्रदेशाध्यक्षांसोबत सल्लामसलत

यंदा तेलंगणामध्ये विधानसभा निवडणूकही होणार
नड्डांची भाजप प्रदेशाध्यक्षांसोबत सल्लामसलत

हैदराबाद : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी नवी दिल्लीत मागील आठवडाभरात अनेक बैठका घेतल्यानंतर भाजप राष्ट्राध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आपला मोर्चा आता दक्षिणेकडील राज्यांकडे वळवला आहे. रविवारी त्यांनी हैदराबाद येथे एक बैठक घेऊन दक्षिणेकडील राज्यांसोबत २०४ लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा केली.

तेलंगणामधील भाजपच्या मुख्यालयात ही बैठक संपन्न झाली. बैठकीस भाजपचे राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोषी देखील उपस्थित होते. याशिवाय अन्य ज्येष्ठ नेते पक्षाचे खासदार आणि आमदार देखील उपस्थित होते. तेलंगणाचे नुकतेच नेमण्यात आलेले प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी देखील या बैठकीस उपस्थित होते. त्यांनीच नड्डा यांचे विमानतळावर स्वागत केले. त्याचवेळी त्यांनी नड्डा १२ राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना संबोधित करतील, असे ट्विट देखील केले होते. अलीकडेच रेड्डी यांनी दक्षिणेकडील राज्यांसाठी कृती आराखडा तयार केला होता. या आराखड्यावर या बैठकीत चर्चा होत आहे. यंदा तेलंगणामध्ये विधानसभा निवडणूकही होणार आहे. त्याबाबत देखील चर्चा या बैठकीत होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in