नफेसिंह राठी हत्याकांडाची सीबीआय चौकशी होणार

या हत्याकांडातील आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत
नफेसिंह राठी हत्याकांडाची सीबीआय चौकशी होणार

चंदिगड : हरियाणाचे ‘इनेलो’ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नफेसिंह राठी यांच्या हत्येची सीबीआय चौकशी होणार असल्याची घोषणा हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी केली. या हत्याकांडातील आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत, असे त्यांनी सांगितले. विधानसभेत बोलताना वीज म्हणाले की, ‘इनोलो’चे प्रदेशाध्यक्ष राठी यांच्या हत्येचा तपास सीबीआयला सोपवला जाईल.

लोकसभा निवडणुकीपूर्वी ही हत्या झाल्याने विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. माजी आमदारासह १२ जणांना गुन्हे दाखल नफे सिंग राठी यांच्या हत्येप्रकरणी हरियाणाच्या माजी आमदारासह ११ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. राठी यांच्या हत्येसाठी तीन खासगी हल्लेखोरांचा वापर झाला. पोलिसांनी माजी आमदार नरेश कौशिक, करमबीर राठी, रमेश राठी, सतीश राठी, गौरव राठी, राहुल व कमल यांच्याविरोधात तसेच पाच अज्ञात व्यक्तींच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यांच्याविरोधात हत्येसह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले. दरम्यान, नफेसिंग राठी यांच्या हत्येच्या मास्टरमाईंडला अटक होईपर्यंत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा इशारा त्यांच्या नातेवाईकांनी दिला.

logo
marathi.freepressjournal.in