Nagaland : मोठी बातमी! नागालँडमध्ये भाजप-राष्ट्रवादी सोबत; एकत्र सत्तेत बसणार

नागालँडमध्ये (Nagaland) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) भाजपसोबत (BJP) हाथ मिळवणी करत सत्तेत सहभागी होणार असून राज्यात अधिकृत विरोधीपक्ष नसणार
Nagaland : मोठी बातमी! नागालँडमध्ये भाजप-राष्ट्रवादी सोबत; एकत्र सत्तेत बसणार
Published on

नागालँडमध्ये (Nagaland) राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) भाजपसोबत (BJP) हाथ मिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या राजकारणात यामुळे चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात एकमेकांचे कट्टर विरोधी असणारे हे २ पक्ष नागालँडमध्ये एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नुकतेच पार पडलेल्या नागालँड विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ आमदार निवडणून आले होते. गेले अनेक दिवस नागालँडमध्ये सत्तेसाठी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार अशा चर्चा होत्या.

नागालँड विधानसभेत ६० जागा आहेत. यामध्ये भाजप आणि एनडीपीपी यांच्या आघाडीला ३७ जागा मिळाला. यावेळी ७ जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस हा तिसरा पक्ष ठरला होता. यावेळी राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर पूर्वचे सरचिटणीस नरेंद्र वर्मा यांनी पात्र काढत ही घोषणा केली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चाललेल्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, यामुळे नागालँड विधानसभेत अधिकृत विरोधी पक्ष नसणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in