संसदेवरील हल्लेखोरांची नार्को चाचणी

संसद सुरक्षा प्रकरणातील आरोपींना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पटियाला हाऊस कोर्टात हजर केले
संसदेवरील हल्लेखोरांची नार्को चाचणी
Published on

नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेचा भंग करणाऱ्या आरोपींना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने शुक्रवारी पटियाला हाऊस कोर्टात हजर केले. येथे न्यायालयाने सर्व आरोपींच्या कोठडीत पुढील आठ दिवसांची वाढ केली आहे. यासोबतच पाचही आरोपींनी नार्को टेस्टसाठी संमती दिली आहे, तर आरोपी नीलमने पॉलीग्राफ टेस्टसाठी संमती देण्यास नकार दिला आहे.

कोर्टाने आदेश दिला की, वकिलाच्या उपस्थितीत आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करून सर्व चाचण्या केल्या जाव्यात. पटियाला हाऊस कोर्टात याबाबत सुनावणी पार पडली. सध्या सर्व आरोपींना ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शुक्रवारी संसद सुरक्षा प्रकरणातील आरोपींना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पटियाला हाऊस कोर्टात हजर केले. तिथे न्यायालयाने त्यांच्या कोठडीत वाढ करण्याचा अर्ज मंजूर केला आहे. यासोबतच नार्को टेस्टसाठी अर्जही करण्यात आला होता, ज्यामध्ये आरोपींनीही होकार दिला. आरोपी ललित झा, महेश कुमावत आणि अमोल शिंदे यांनी पॉलीग्राफ चाचणीसाठी संमती दिली, तर आरोपी सागर शर्मा आणि मनोरंजन यांनी पॉलीग्राफ, नार्को विश्लेषण आणि ब्रेन मॅपिंगसाठी संमती दिली. तर आरोपी नीलमने पॉलीग्राफ चाचणीसाठी संमती देण्यास नकार दिला.

logo
marathi.freepressjournal.in