

सीतामढी/बेतिया बिहार : विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदारांनी विरोधी 'इंडिया' आघाडीला '६५ व्होल्टचा झटका' दिला आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हाणला.
बिहार निवडणुकीचा प्रचार इशारा दिला की, 'जर राजद संपवताना मोदी यांनी मतदारांना आघाडी सत्तेवर आली, तर ते लोकांच्या डोक्यावर 'कट्टा' ठेवून त्यांना 'हात वर' करण्याचा आदेश देतील.'
पहिल्या टप्प्यात झालेले अधिकचे मतदान हे रालोआच्या बाजूने असल्याचा विश्वास व्यक्त करत मोदी म्हणाले, 'तुम्ही विरोधकांना ६५ व्होल्टचा झटका दिला आहे. त्यामुळे आता त्यांची झोप उडाली आहे.'
११ नोव्हेंबरला होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानात पहिल्या टप्प्याचा विक्रम मोडा. रालोआने फक्त सर्व जागाच जिंकू नयेत, तर प्रत्येक बूथवर आघाडी घ्यावी, असे आवाहन मोदी यांनी केले.
बेतिया येथे झालेल्या अखेरच्या सभेत मोदी म्हणाले की, रालोआ सरकारच्या शपथविधीला मी पुन्हा येणार आहे. मी माझ्या प्रचाराचा प्रारंभ भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मभूमीपासून सुरू केला आणि आज तो समाप्त करतो आहे त्या भूमीवर जिथे बापू गांधी महात्मा बनले, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री नितीश कुमार फक्त पहिल्या सभेला उपस्थित होते, पण मोदींनी त्यांचे कौतुक करत म्हटलं, 'नितीश यांनी बिहारमधील जंगलराज संपवलं.'
'कट्टा सरकार' हे रूपक वापरत मोदींनी राजदवर आरोप केला की, ते काँग्रेसच्या डोक्यावर देशी पिस्तूल ठेवून त्यांना तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देण्यास भाग पाडतात.
बिहारच्या जनतेला 'कट्टा सरकार' नको आहे. त्यांना 'स्टार्टअप सरकार' हवे आहे. जंगलराजवाले सत्तेवर आले तर लोकांच्या डोक्यावर बंदूक ठेवून 'हात वर' म्हणतील. पण रालोआ सरकार रोजगार आणि आत्मविश्वास देईल, असे मोदी म्हणाले.
राजद आणि काँग्रेसचा थेट उल्लेख न करता मोदी म्हणाले, 'एक म्हणजे देशातील सर्वात भ्रष्ट पक्ष आणि दुसरा बिहारमधील सर्वात भ्रष्ट पक्ष. दोन्ही पक्ष राजघराण्यांनी चालवलेले आहेत. राहुल गांधींना उद्देशून मोदी म्हणाले की, 'काँग्रेसचे नामदार पोहण्याचा सराव करत आहेत,' असा टोला त्यांनी त्यांच्या तलावातील डुबकीवरून लगावला.
गांधी यांनी केलेला 'मतचोरी'चा आरोप हा पराभवाची तयारी असल्याचे मोदी म्हणाले.