आईच्या निधनानंतर मुंडन न करणारे हिंदू कसे? नरेंद्र मोदी हिंदूच नाहीत! लालूप्रसाद यादव यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी मोदी हे हिंदूच नाहीत, अशा शब्दांत जोरदार हल्ला केला
आईच्या निधनानंतर मुंडन न करणारे हिंदू कसे? 
नरेंद्र मोदी हिंदूच नाहीत! लालूप्रसाद यादव यांची टीका
(संग्रहित छायाचित्र)

पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी मोदी हे हिंदूच नाहीत, अशा शब्दांत जोरदार हल्ला केला. रविवारी पाटण्यात गांधी मैदानातील जनविश्वास रॅलीच्या सभेत बोलताना लालूप्रसाद यांनी ही जोरदार टीका केली.

मोदी हे हिंदू नसल्याबाबत दावा करताना लालू प्रसाद यादव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईच्या निधनानंतर मुंडन केले नव्हते. इतकेच नव्हे तर मोदी यांचा एकेरी उल्लेख करताना कुटुंबव्यवस्थेचा हवाला देत ते म्हणाले की, मोदी म्हणजे काय? मोदी काही नाही. मोदींना कुटुंबही नाही. अरे भाऊ, तुझ्या कुटुंबात मूल का नव्हते ते सांगा. जास्त मुले झालेल्यांना मोदी म्हणतात की घराणेशाही आहे, त्यासाठी तो लढत आहे. मंडल आयोग, दलित वर्गांसाठी केलेल्या योजना, प्राणप्रतिष्ठा सोहळा आदींचा उल्लेख करीत लालूप्रसाद यादव यांनी मोदी तसेच नितीश कुमार यांच्यावर टीकेचा भडिमार केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in