तृणमूल काँग्रेसमुळे बंगालची संस्कृती धोक्यात; मोदींचा तृणमूलवर घणाघाती हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. तृणमूल काँग्रेसने राज्यात घुसखोरीला प्रोत्साहन देऊन बंगालची भाषा आणि संस्कृती बदलण्याचा प्रयत्न केला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
तृणमूल काँग्रेसमुळे बंगालची संस्कृती धोक्यात; मोदींचा तृणमूलवर घणाघाती हल्ला
ANI
Published on

पुरुलिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. तृणमूल काँग्रेसने राज्यात घुसखोरीला प्रोत्साहन देऊन बंगालची भाषा आणि संस्कृती बदलण्याचा प्रयत्न केला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच, ममता बॅनर्जी यांचे सरकार 'आदिवासी विरोधी' असून राज्यात 'महाजंगलराज' सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप बंगालमध्ये स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन करेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

२०२६ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पुरुलिया येथील जाहीर सभेत बोलताना मोदींनी भाजपच्या प्रचाराला 'विकास विरुद्ध तुष्टीकरण' असे वळण दिले. घुसखोरीमुळे बंगालची अस्मिता आणि भाषा धोक्यात आली आहे. तृणमूल सरकार केवळ व्होट बँकेच्या राजकारणासाठी हे करत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला."ममता सरकार आदिवासी विरोधी आहे. जंगलमहाल भागातील आदिवासींच्या जमिनी बळकावण्यात आल्या असून, त्यांना भ्रष्टाचार, भीती आणि अविकासाच्या दुष्टचक्रात ढकलले आहे, असे मोदी म्हणाले.

संताली भाषेचा आणि आदिवासी ओळखीचा तृणमूल सरकारकडून अपमान केला जात आहे. दुसरीकडे, मदरसा शिक्षणासाठी विक्रमी बजेट दिले जात आहे, हे निव्वळ तुष्टीकरण असल्याचे त्यांनी नमूद केले.: बंगालमध्ये तृणमूलच्या 'सिंडिकेट' राज्याशिवाय कोणतेही काम होत नाही. 'कट मनी' दिल्याशिवाय कामे अडवली जातात. हे सरकार क्रूर असून त्यांना केवळ लुटण्यात रस आहे, अशी टीका मोदींनी केली.

'पालटानो दरकार' ; लोक तृणमूलला कंटाळलेत

पुरुलिया, बांकुरा आणि झाडग्राममधील जनतेने यापूर्वी भाजपला साथ दिली होती कारण त्यांना खंडणी आणि भीतीपासून मुक्तता हवी होती. आता संपूर्ण पुरुलिया 'पालटानो दरकार' (बदल घडवणे आवश्यक आहे) असे म्हणत असून, लोक तृणमूलच्या अत्याचाराला कंटाळले आहेत, असा दावाही त्यांनी केला. जेथे जेथे अत्याचाराने सीमा ओलांडली, तेथे लोकांनी भाजपला पर्याय म्हणून निवडले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप बंगालमध्ये स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन करेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in