२०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र; 'आम्ही हे करून दाखवू' - मोदींनी दिला नवा नारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत प्रमुख पदावर (मुख्यमंत्री ते पंतप्रधान) २५ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने 'विकसित भारत संकल्प सभेत' एक नवीन नारा दिला आहे.
२०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र; आम्ही हे करून दाखवू - मोदींनी दिला नवा नारा
२०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र; आम्ही हे करून दाखवू - मोदींनी दिला नवा नारा
Published on: 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत प्रमुख पदावर (मुख्यमंत्री ते पंतप्रधान) २५ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने 'विकसित भारत संकल्प सभेत' एक नवीन नारा दिला आहे. 'आम्ही हे करून दाखवू ' (वुई विल डू इट) असा आत्मविश्वास व्यक्त करत त्यांनी २०४७ पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनविण्याचा दृढ संकल्प सोडला आहे. मात्र, याचवेळी त्यांनी निवडणुकीदरम्यान होणाऱ्या जातीपातीच्या राजकारणावर आणि मतपेटीच्या राजकारणावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

मोदी यांनी आज बुधवारी सार्वजनिक प्रशासनातील २५ वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तेथे मोदींनी देशभरातील भाजपा कार्यकर्त्यांना व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित केले. ७ ऑक्टोबर २००१ रोजी जेव्हा त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, तेव्हा सार्वजनिक जीवनातील हा टप्पा आपण कधी गाठू, अशी कल्पनाही त्यांनी केली नव्हती.

सरकारचे प्रमुख म्हणून देशाची सेवा करत असताना आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत, असे त्यांनी सांगितले. या यशाचे श्रेय त्यांनी जनतेच्या अखंड आशीर्वादाला दिले आणि भाजप, एनडीए तसेच लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in