नासाच्या Lunar Reconnaissance Orbiterने टिपले चांद्रयान -३ च्या लँडिंग साईटचे फोटो

चांद्रयान -३ लँडिंग साइट चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून सुमारे ६०० किलोमीटर अंतरावर आहे.
नासाच्या Lunar Reconnaissance Orbiterने टिपले चांद्रयान -३ च्या लँडिंग साईटचे फोटो
Published on

अमेरिकन स्पेस एजन्सी NASAच्या Lunar Reconnaissance Orbiter(LRO) ने चंद्रयान-३ लँडिंग साईटचे फोटो टिपले आहेत. २३ ऑगस्ट रोजी यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रवाजवळ आहे. चांद्रयान -३ लँडिंग साइट चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून सुमारे ६०० किलोमीटर अंतरावर आहे.

नासा ऑरिबिटरसोबत जोडलेल्या कॅमेऱ्याने विक्रम लँडरचे चार दिवसांनंतर Oblique ViEW (42-डिग्री स्ल्यू अँगल) क्लिक केले आहेत. नासाने १८ जून २००९ रोजी प्रक्षेपित केलेल्या NASA ऑर्बिटरने आतापर्यंत डेटा गोळा केला आहे, ज्याने चंद्रावरील गोष्टींच्या आधारे महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. त्याने आपल्या निवेदनात सुक्ष्म मातीचा पृष्ठभाग दिसत असल्याचं म्हटलं आहे.

इस्त्रोने चांद्रयान -३ चं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करत विक्रम रचला आहे. यासोबत भारत चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा पहिला देश ठऱला तर चंद्राच्या दक्षिण ध्रवावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश ठरला आहेत.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवार लँडिंग केल्यानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर विविध गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे. ज्यात सल्फर आणि इतर किरकोळ घटकांची उपस्थिती सोधणं, तापमान रेकॉर्ड करणं आणि त्यांच्या सभोतालच्या हालचाली ऐकणं, यांचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in