नागरी सहकारी बँका आणि पतसंस्थांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय परिषद

केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी.एल.वर्मा परिषदेच्या उद्‌घाटन सत्राला उपस्थित राहतील
नागरी सहकारी बँका आणि पतसंस्थांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय परिषद

“शहरी सहकारी पतक्षेत्राची भविष्यातील भूमिका” या विषयावर गुरुवारी नवी दिल्ली येथे होणाऱ्या शेड्युल्ड आणि बहु-राज्य नागरी सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या राष्ट्रीय परिषदेत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री,अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ही परिषद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “सहकार से समृद्धी” (सहकारातून समृद्धी) या संकल्पनेला अधिक बळकटी देणारी ठरेल. केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी.एल.वर्मा परिषदेच्या उद्‌घाटन सत्राला उपस्थित राहतील.

या परिषदेत होणाऱ्या व्यावसायिक सत्रांमध्ये, शेड्युल्ड आणि बहु राज्य नागरी सहकारी संस्था आणि पतसंस्थांशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा केली जाईल. नागरी सहकारी बँकांची भविष्यातील भूमिका आणि भारतीय रिझर्व्ह बँकेतील तज्ज्ञ समितीच्या शिफारशी, राष्ट्रीय सहकारी वित्त आणि विकास सहकार्य ही नागरी सहकारी क्षेत्रासाठी काम करणाऱ्या संस्थेची भूमिका, बँकिंग नियमन (सुधारणा) कायदा, २०२० आणि त्याचे परिणाम, वित्तीय क्षेत्रात बहु-राज्य पतसंस्थांची भूमिका आणि सहकारी पतसंस्थांचे नियमन आणि कर आकारणी या संबधीच्या मुद्द्य्नाचा समावेश चर्चांमध्ये असेल.

यावेळी १०० वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरी सहकारी बँकांचा या परिषदेत सत्कारही करण्यात येणार आहे.देशात अशा १९७ बँका आहेत. यावरून देशातील सहकार आणि सहकारी बँकांची मुळे किती खोलवर रुजलेली आहेत,याची प्रचिती येते. मान्यवरांच्या हस्ते होणाऱ्या सत्कारासाठी अनेक बँकांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.

नागरी सहकारी बँका या देशातील सर्वात जुन्या बँकिंग संस्थांपैकी एक आहेत.त्या एका शतकाहून अधिक काळापासून अस्तित्वात आहेत. समाजातल्या विविध समुदायांशी संबंधित व्यक्तींकडून या बॅंका सुरू करण्यात आल्या असून त्यांच्याकडून त्याचे व्यवस्थापन केले जाते,ज्यात शिक्षक, वकील, व्यापारी, डॉक्टर, अभियंते, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर क्षेत्रांचा समावेश असून आपल्या सदस्यांना त्या बँकिंग सेवा प्रदान करत आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in