‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरण : राहुल, सोनियांना दिल्ली हायकोर्टाची नोटीस

दिल्ली उच्च न्यायालयाने ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. ईडीने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते, परंतु राऊज ॲव्हेन्यू न्यायालयाने दखल घेण्यास नकार दिला होता.
‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरण : राहुल, सोनियांना दिल्ली हायकोर्टाची नोटीस
‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरण : राहुल, सोनियांना दिल्ली हायकोर्टाची नोटीसPhoto : X (@LiveLawIndia)
Published on

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. ईडीने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते, परंतु राऊज ॲव्हेन्यू न्यायालयाने दखल घेण्यास नकार दिला होता.

सुनावणीदरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयात ईडीचे प्रतिनिधित्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, अंतिम निष्कर्ष असा आहे की आरोपींना ५० लाख रुपयांच्या बदल्यात दोन हजार कोटी रुपयांची मालमत्ता मिळाली. या प्रकरणातील पुढील सुनावणी १२ मार्च रोजी होणार आहे.

ईडीने राऊज ॲव्हेन्यू न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि आता दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपींना नोटीस बजावली आहे. ईडीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने सोनिया गांधी आणि राहुल गांधींसह सात आरोपींना नोटीस बजावल्या आहेत.

तुषार मेहता यांनी सांगितले की, जून २०१४ मध्ये एका व्यक्तीने खासगी तक्रार दाखल केली होती, ज्याची कनिष्ठ न्यायालयाने दखल घेतली आणि त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने त्यास स्थगिती दिली. तुषार मेहता यांनी सांगितले की, ईडीने तपास पूर्ण केला, पुरावे गोळा केले आणि आरोपींचे जबाब नोंदवले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in