दिल्लीतील नॅशनल हेराल्डचे कार्यालय सील ; ईडीची कारवाई

ईडीने नॅशनल हेराल्डच्या कार्यालयाला टाळे ठोकले असून आमच्या परवानगीशिवाय कार्यालय खोलू नये, असे निर्देश ईडीने दिले आहेत
दिल्लीतील नॅशनल हेराल्डचे कार्यालय सील ; ईडीची कारवाई
ANI
Published on

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी नॅशनल हेराल्डचे दिल्लीतील कार्यालय सील केले आहे. मंगळवारी ईडीच्या पथकाने दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यासह नॅशनल हेराल्डच्या १२ ठिकाणांवर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत छापे टाकले होते. कॉंग्रेस नेत्या सोनिया आणि राहुल गांधी यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

या छाप्यांविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी नॅशनल हेराल्ड कार्यालयाबाहेर निदर्शने केली. यावेळी त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली. ईडीने नॅशनल हेराल्डच्या कार्यालयाला टाळे ठोकले असून आमच्या परवानगीशिवाय कार्यालय खोलू नये, असे निर्देश ईडीने दिले आहेत.

नॅशनल हेराल्डच्या गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी तसेच खासदार राहुल गांधी यांची ईडीकडून सध्या चौकशी सुरू आहे. दोघांनाही सातत्याने चौकशीसाठी बोलावले जात आहे. याच कारणामुळे काँग्रेसने राजधानी दिल्लीसह देशभर आंदोलने केली होती.

logo
marathi.freepressjournal.in