देशाचा निर्धार, मोदीच पंतप्रधान: शहा

नागरिक सुधारणा कायदा आणण्यास आणि जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटवण्यास विरोध केला.
देशाचा निर्धार, मोदीच पंतप्रधान: शहा

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनाच तिसऱ्या वेळी पंतप्रधान बनवण्याचा निर्धार देशवासीयांनी केला आहे. देशात सध्या महाभारतातील युद्धासारखी परिस्थिती आहे. कौरव आणि पांडवांप्रमाणेच आजही दोन पक्ष आहेत. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच देशाचे हित साधण्यास सक्षम आहे. विरोधी इंडिया आघाडी म्हणजे घराणेशाही पोसणाऱ्या सात राजकीय पक्षांचा गट आहे. त्यांचा भर भ्रष्टाचार आणि नाकर्तेपणावर असल्याचे टीकास्त्र सोडत गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. काँग्रेसने राम मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण अव्हेरले. नागरिक सुधारणा कायदा आणण्यास आणि जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटवण्यास विरोध केला. काँग्रेस केवळ तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे, असा आरोपही शहा यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in