नैसर्गिक वायू उत्पादनात ३० टक्के वाढ होणार

कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल घोषित केल्यानंतर गुंतवणूकदारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.
नैसर्गिक वायू उत्पादनात ३० टक्के वाढ होणार

रिलायन्स इंडस्ट्रीज लि. या वर्षाच्या अखेरीस बंगालच्या उपसागरात खोल समुद्रात एमजे गॅस कन्डेन्सेट फिल्डमध्ये ब्लॉक केजी-डी ६मध्ये काम करण्यास सुरुवात करणार आहे. त्यामुळे भारताच्या एकूण नैसर्गिक वायूच्या उत्पादनात तब्बल ३० टक्के वाढ होणार आहे.

एमजे गॅस कन्डेन्सेट फिल्ड प्रकल्प हा सुरू करण्याच्या प्रक्रियेत असून, या प्रकल्पातून वर्षाअखेरीस पहिले वायू उत्पादन सुरू होईल, असे संजय रॉय, सीनियर व्हाइस प्रेसिडेंट (शोधन आणि उत्पादन), रिलायन्स इंडस्ट्रीज लि. यांनी सांगितले. कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल घोषित केल्यानंतर गुंतवणूकदारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.

रिलायन्स आणि आमचा भागीदार बीपी यांनी पूर्वोत्तर भागातील सागरातील तेल विहिरी शोध भागातील एमजे हा तिसरा आणि अखेरचा शोधातील संच असणार आहे. दोन संचातील उत्पादन सुरू आहे आवश्यक त्या परवानग्या मिळवल्यानंतर आणि साहित्य संबंधित ठिकाणी पोहचले आहेत. उत्पादन सुरू होण्यापूर्वी योग्य त्या चाचण्या घेतल्या जातील. त्यानंतर कृष्णा गोदावरी बेसिन ब्लॉकमधून उत्पादन सुरू केले जाईल, असेही ते म्हणाले.

एमए फिल्डमधील उत्पादन २०१९मध्ये थांबवण्यात आले होते, तर डी-१ आणि डी-३मधील फेब्रुवारी २०२०मध्ये उत्पादन घेणे थांबवले होते.

तसेच अन्य वायू क्षेत्रे हे सरकारकडे हस्तांतरित केले होते किंवा सरकारकडे ताब्यात घेतले होते. कालमर्यादेत उत्पादन घेण्यास प्रारंभ न केल्याने सरकारने ही कारवाई केली होती. एमजेचा साठा हा डी१-डी३च्या दोन हजार मीटर खाली वायू क्षेत्र आहे. केजी-डी६ मधील उत्पादनासाठी रिलायन्सचा ६६.६७ टक्के, तर बीपीचा हिस्सा ३३.३३ टक्के आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in