नॅचरल्स आइस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन कामथ यांचे निधन

नॅचरल्स आइस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन कामथ यांचे निधन झाल्याचे त्यांच्या कंपनीने एका ऑनलाईन पोस्टमध्ये म्हटले आहे.
नॅचरल्स आइस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन कामथ यांचे निधन

मुंबई : नॅचरल्स आइस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन कामथ यांचे निधन झाल्याचे त्यांच्या कंपनीने एका ऑनलाईन पोस्टमध्ये म्हटले आहे. ते ७५ वर्षांचे होते आणि शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. रघुनंदन कामथ यांचे वडील कर्नाटकातील मंगळुरू या गावातील आंबा विक्रेते होते.

वयाच्या १४ व्या वर्षी रघुनंदन यांनी आपल्या भावाच्या भोजनगृहात काम सुरू केले. ते १९८४ मध्ये मुंबईत आले आणि जुहूच्या उपनगरात फक्त सहा कर्मचारी आणि १२ फ्लेवर्ससह पहिले आइस्क्रीम पार्लर उघडले. पुढे मागणी वाढतच गेली आणि १९९४ मध्ये त्यांनी आणखी पाच दुकाने उघडली. सध्या १५ शहरांमध्ये त्यांची १६५ पेक्षा जास्त दुकाने आहेत.

logo
marathi.freepressjournal.in