स्वच्छ शहर सर्वेक्षण स्पर्धेत नवी मुंबई शहराला तिसरा क्रमांक

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
 स्वच्छ शहर सर्वेक्षण स्पर्धेत नवी मुंबई शहराला तिसरा क्रमांक

देशातील स्वच्छ शहर सर्वेक्षण स्पर्धेत सलग सहाव्यांदा मध्य प्रदेशातील इंदूर देशात पहिल्या क्रमांकावर आले आहे. सुरतचा दुसरा तर नवी मुंबई शहराला तिसरा क्रमांक मिळाला आहे. तसेच स्वच्छ राज्य स्पर्धेत महाराष्ट्राला तिसरा क्रमांक मिळाला.

केंद्र सरकारने वार्षिक स्वच्छ शहरांचा निकाल शनिवारी जाहीर केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीप पुरी उपस्थित होते. स्वच्छ शहर स्पर्धेत इंदूर व सुरतने आपले पहिले व दुसरे स्थान कायम ठेवले. तर विजयवाडा शहराने आपले तिसरे स्थान गमावले. हा तिसरा क्रमांक नवी मुंबईने पटकावला. या पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय नगरविकासमंत्री हार्दिक पुरी म्हणाले की हा जगातील सर्वात मोठा स्वच्छता सर्वे आहे. २०२२ मध्ये या सर्व 4255 शहरांनी सहभाग घेतला.

पाचगणी कराडला पहिला व तिसरा क्रमांक

एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात महाराष्ट्रातील पाचगणी ला पहिला क्रमांक छत्तीसगडच्या पाटणला दुसरा तर महाराष्ट्राच्या कराडला तिसरा क्रमांक मिळाला आहे तसेच देशातील स्वच्छ कन्टोमेंट बोर्डात महाराष्ट्रातील देवळालीला जिल्हा पहिला क्रमांक मिळाला

स्वच्छ भारत सर्वेक्षणाचे निकष काय?

सातव्या स्वच्छ सर्वेक्षणास स्वच्छ भारत मिशन व नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था यांचे स्वच्छतेच्या विविध निकषांवर परीक्षण करण्यात आले देशातील 4354 शहरांनी यंदा यात भाग घेतला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in