नवनीतकुमार सेहगल प्रसार भारतीचे अध्यक्ष

नवनीतकुमार सेहगल प्रसार भारतीचे अध्यक्ष

प्रसार भारतीचे यापूर्वीचे अध्यक्ष ए. सूर्य प्रकाश यांची मुदत फेब्रुवारी २०२० मध्ये संपुष्टात आली. त्यानंतर निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी सेहगल यांची नियुक्ती केली

नवी दिल्ली : प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी निवृत्त सनदी अधिकारी नवनीतकुमार सेहगल यांची शनिवारी नियुक्ती करण्यात आली. गेल्या जवळपास चार वर्षांपासून हे पद रिक्त होते. प्रसार भारतीचे यापूर्वीचे अध्यक्ष ए. सूर्य प्रकाश यांची मुदत फेब्रुवारी २०२० मध्ये संपुष्टात आली. त्यानंतर निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी सेहगल यांची नियुक्ती केली. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी अथवा सेहगल हे वयाची ७०० वर्षे पूर्ण करीपर्यंतच्या कालावधीसाठी असेल. माहिती-प्रसारण मंत्रालयाने याबाबतचा आदेश १५ मार्च रोजी जारी केला. सेहगल हे १९८८च्या तुकडीतील उत्तरप्रदेश श्रेणीतील अधिकारी आहेत. ते गेल्या वर्षी निवृत्त झाले. उपराष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांची निवड केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in