गोव्यात नौदलाच्या विमानाला अपघात ;धावपट्टीवर टायर फुटल्याने वाहतुकीस अडथळा

दुपारी १२ वाजून १४ मिनिटांनी नौदलाचे मिग-२९ के प्रकारचे लढाऊ विमान नेहमीच्या सरावासाठी उड्डाण घेत होते
गोव्यात नौदलाच्या विमानाला अपघात ;धावपट्टीवर टायर फुटल्याने वाहतुकीस अडथळा
PM
Published on

पणजी : गोव्यातील दाबोली विमानतळावर मंगळवारी नौदलाच्या मिग-२९ के प्रकारच्या लढाऊ विमानाला टायर फुटल्याने अपघात झाला. अपघातात वैमानिकाला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, अपघातग्रस्त विमान धावपट्टीवर असल्याने काही काळ अन्य प्रवासी विमानांचा खोळंबा झाला.

दुपारी १२ वाजून १४ मिनिटांनी नौदलाचे मिग-२९ के प्रकारचे लढाऊ विमान नेहमीच्या सरावासाठी उड्डाण घेत होते. त्यावेळी अचानक धावपट्टीवर विमानाचा टायर फुटला. अपघातात वैमानिकाला इजा झाली नाही. तसेच विमानाचेही अन्य काही नुकसान झाले नाही. पण, अपघातग्रस्त विमान धावपट्टीवरून हटवेपर्यंत अन्य प्रवासी विमानांचा खोळंबा झाला. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मिग विमान धावपट्टीवरून हटवण्यात आले आणि प्रवासी वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

logo
marathi.freepressjournal.in