ट्रक जाळण्याच्या प्रकरणातील नक्षलवाद्याला अटक

पोलिसांनी दोडीकडून धनुष्यबाण आणि माओवाद्यांचे बॅनर आणि पोस्टर्स जप्त केले, अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली.
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक

नारायणपूर : छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात गेल्या वर्षी ट्रकला आग लावण्यात सहभागी असलेल्या एका ५० वर्षीय नक्षलवाद्याला रविवारी अटक करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

जयलाल दोडीला असे या नक्षलवाद्याचे नाव असून त्याला जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी), इंडो-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) आणि स्थानिक पोलिसांनी धानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजपूर टेकनार आणि ढोरी गावांच्या जंगलांमध्ये नक्षलवादी विरोधी अभियानात पकडले.

दोडी हा माओवाद्यांच्या नेलनार एरिया कमिटीचा सक्रिय साथीदार होता, जानेवारी २०२२ मध्ये झरी गावातील जंगलात तीन ट्रक जाळण्यात आणि त्यांच्या चालकांवर हल्ला करण्यात त्याचा सहभाग होता. पोलिसांनी दोडीकडून धनुष्यबाण आणि माओवाद्यांचे बॅनर आणि पोस्टर्स जप्त केले, अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली.

logo
marathi.freepressjournal.in