मुंबई-हावडा रेल्वे सेवा विस्कळीत; नक्षलवाद्यांनी उडवला झारखंडच्या गोयलकेरा भागातील लोहमार्ग

यामुळे हावाडा-मुंबई मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली असून यामुळे किमान १३ रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या. तर एका रेल्वेचा मार्ग बदलण्यात आला आहे. या घटनेनंतर लोहमार्ग दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
मुंबई-हावडा रेल्वे सेवा विस्कळीत; नक्षलवाद्यांनी उडवला झारखंडच्या गोयलकेरा भागातील लोहमार्ग
Published on

झारखंडच्या गोयलकेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनोहरपूर ते गोयलकेरा दरम्यानचा रेल्वे ट्रॅक नक्षलवाद्यांनी उडवून दिल्याची घटना काल रात्री घडली. झारखंडच्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यात बंदी घातलेल्या भाकप(मावोवादी) संघटनेच्या नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणल्याचा आरोप केला जात आहे.

यामुळे हावाडा-मुंबई मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली असून यामुळे किमान १३ रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या. तर एका रेल्वेचा मार्ग बदलण्यात आला आहे. या घटनेनंतर लोहमार्ग दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

पश्चिम सिंगभूमचे पोलीस अधीक्षक आशुतोष शेखर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी रांचीपासून अंदाजे १५० किंमी अंतरावर असलेल्या गोयलकेरा आणि पोसोईटा रेल्वे स्थानकांदरम्यान गुरुवारच्या रात्री ही घटना घडली आहे.

या घटनेनंतर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रेल्वे रुळ दुरुस्तीच्या कामाला सुरु करण्यात आली असून लवकरच रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत होईल. तसेच या परिसरात मावोवाद्यांनी बॅनर आणि पोस्टर्स लावले लावल्याची माहिती पीटीआयने शेखर यांच्या हवाल्याने दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in