दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवादी ठार

आंतरजिल्हा सीमेवर नक्षलवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीच्या आधारे ही कारवाई सुरू करण्यात आली.
दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवादी ठार
PM

दंतेवाडा : सुमारे तीन दशकांपासून माओवादी संघटनेत सक्रिय असलेला आणि ८ लाख रुपयांचे बक्षीस ज्याच्यावर लावले आहे, असा एक नक्षलवादी छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत ठार झाला.

चंद्रण्णा उर्फ ​​सत्यम असे या नक्षलवाद्याचे नाव असून तो ५० वर्षांचा होता. सुकमा जिल्ह्यातील गोलापल्ली भागातील तो रहिवासी असून ३० वर्षांहून अधिक काळ प्रतिबंधित माओवादी संघटनेत तो सक्रिय होता. नक्षलवादी हिंसाचाराच्या अनेक घटनांमध्ये त्याचा सहभाग होता, असे दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दंतेवाडा-सुकमा जिल्ह्यांच्या सीमेवरील गोंडपल्ली, परलागट्टा आणि बडेपल्ली गावांदरम्यानच्या जंगलातील टेकडीवर बुधवारी सुरक्षा दलांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना हा संघर्ष झाला. आंतरजिल्हा सीमेवर नक्षलवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीच्या आधारे ही कारवाई सुरू करण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in