NCERT चा बिनशर्त माफीनामा; संपूर्ण पुस्तक मागे घेण्याचेही केले जाईल

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकाबाबत झालेल्या वादानंतर बिनशर्त माफी मागितली आहे. आता संपूर्ण पुस्तक मागे घेण्यात आले असल्याचेही ‘एनसीईआरटी’ने जाहीर केले आहे.
NCERT चा बिनशर्त माफीनामा; संपूर्ण पुस्तक मागे घेण्याचेही केले जाईल
NCERT चा बिनशर्त माफीनामा; संपूर्ण पुस्तक मागे घेण्याचेही केले जाईल
Published on

नवी दिल्ली : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकाबाबत झालेल्या वादानंतर बिनशर्त माफी मागितली आहे. या पुस्तकात न्यायव्यवस्थेवरील एक प्रकरण होते, ज्यामुळे वाद निर्माण झाला होता. आता संपूर्ण पुस्तक मागे घेण्यात आले असल्याचेही ‘एनसीईआरटी’ने जाहीर केले आहे.

‘एनसीईआरटी’ने अलीकडेच 'एक्सप्लोरिंग सोसायटी: इंडिया अँड बियॉन्ड (भाग २) ' हे इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राचे पुस्तक प्रकाशित केले. 'द रोल ऑफ ज्युडिशियरी इन अवर सोसायटी' या धड्याच्या चौथ्या प्रकरणात भारताच्या न्यायव्यवस्थेसमोरील आव्हानांवर चर्चा करण्यात आली होती. या प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप, खटल्यांचा मोठा प्रलंबित भाग आणि पुरेशा न्यायाधीशांचा अभाव यांसारख्या न्यायव्यवस्थेसमोरील असंख्य समस्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आलाय. याच भागातून वाद निर्माण झाला होता.

सोशल मीडियावर माफी

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये ‘एनसीईआरटी’ने म्हटले आहे की, इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकात न्यायव्यवस्थेवरील एक प्रकरण प्रकाशित करण्यात आले होते. या प्रकरणाबद्दल संचालक आणि ‘एनसीईआरटी’चे सर्व सदस्य या प्रकरणाबद्दल बिनशर्त माफी मागत आहेत. तसेच संपूर्ण पुस्तक मागे घेण्यात आलंय आणि आता ते कुठेही उपलब्ध नाही, असेही स्पष्ट केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून नाराजी

सुप्रीम कोर्टानेही या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने पुस्तकाचे प्रकाशन, पुनर्मुद्रण आणि डिजिटल वितरण पूर्णपणे बंदी घातली होती. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, पुस्तकातील काही मजकूर आक्षेपार्ह होता. न्यायालयाने कडक टिप्पणी केली, असे म्हटले आहे की, "एक गोळी झाडण्यात आली आणि न्याय व्यवस्थेच्या संस्थेला दुखापत झालेली आहे.

गुणवत्ता राखण्याचे आश्वासन

एनसीईआरटीने संपूर्ण घटनेबद्दल खेद व्यक्त केलाय आणि कोणालाही झालेल्या कोणत्याही दुखापतीबद्दल खेद व्यक्त केलाय. शैक्षणिक सामग्री तयार करताना अचूकता, संवेदनशीलता आणि जबाबदारीचे उच्च मानक राखण्यासाठी ते वचनबद्ध असल्याचेही संस्थेनं म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in