आता 'इंडिया' ऐवजी 'भारत', 'NCERT'च्या पुस्तकात बदल करण्याची मागणी मान्य

आता येत्या काही दिवसात NCERTच्या पुस्तकात इंडिया शब्द हद्दपार होऊन त्याऐवजी भारत शब्द दिसून येणार आहे.
आता 'इंडिया' ऐवजी 'भारत', 'NCERT'च्या पुस्तकात बदल करण्याची मागणी मान्य
Published on

काही दिवसांपासून भारत आणि इंडिया या नावावरुन बरचं घमासान सुरु आहे. आगामी काळात इंडिया हे नाव मागे पडून भारत या नावाचाच पुरस्कार केला जाणार असल्याचं दिसून लागलं आहे. हळूहळू याबाबतची अंमलबाजावणी देखील होई लागली आहे. आता नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगकडे(NCERT)त्यांच्या अभ्यासक्रमातून पाठ्यपुस्तकातून इंडिया शब्द हटवून त्याजागी भारत शब्द घेण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली होती. आता ती मागणी मान्य करण्यात आली आहे. इंडिया टुडेनं याबाबतच सविस्तर वृत्त दिलं आहे.

यानुसार आता येत्या काही दिवसात NCERTच्या पुस्तकात इंडिया शब्द हद्दपार होऊन त्याऐवजी भारत शब्द दिसून येणार आहे. भारत हा शब्द स्वीकारणार असल्याचं NCERTच्या पॅनलने सांगण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात येणाऱ्या पुस्तकात इंडिया ऐवजी भारत हा उल्लेख असणार आहे, अशी माहिती पॅनच्या एका सदस्याने दिली आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी नाव बदलण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आलं होतं. आता ती मागणी मान्य करण्यात आली आहे. संस्थेकडून इंडिया हे नाव वगळून भारत हा शब्द वापरण्यात येईल याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. त्यावरुन सोशल मीडियावर देखील नेटकऱ्यांकडून अनेक मतमतांतरं समोर आली होती.

logo
marathi.freepressjournal.in