एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांची छपाई अस्पष्ट, दर्जाहीन

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी)च्या पाठ्यपुस्तकांच्या छपाईच्या दर्जाबाबत विद्यार्थी आणि पालकांनी केलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली आहे. विशेषतः काही पुस्तकांतील मजकूर अस्पष्ट आणि वाचण्यास कठीण असल्याच्या तक्रारी एनसीईआरटीकडे आल्या आहेत...
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांची छपाई अस्पष्ट, दर्जाहीन
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांची छपाई अस्पष्ट, दर्जाहीन X
Published on: 

नवी दिल्ली : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी)च्या पाठ्यपुस्तकांच्या छपाईच्या दर्जाबाबत विद्यार्थी आणि पालकांनी केलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली आहे. विशेषतः काही पुस्तकांतील मजकूर अस्पष्ट आणि वाचण्यास कठीण असल्याच्या तक्रारी एनसीईआरटीकडे आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित मुद्रकांवर कारवाईचे संकेत एनसीईआरटीने दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयातील वकील विनीत जिंदाल यांनी इयत्ता दहावीच्या एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतील छपाईच्या त्रुटींकडे लक्ष वेधल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आपल्या मुलाच्या पाठ्यपुस्तकातील मजकूर अत्यंत लहान, धूसर आणि खराब छपाईचा असल्याने विद्यार्थ्यांना वाचताना अडचणी येत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली होती.

सखोल चौकशी करणार

पालकांच्या तक्रारींनंतर या प्रकरणाची प्राधान्याने चौकशी करण्यात येत आहे. छपाईतील त्रुटींना जबाबदार असलेल्या मुद्रकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे एनसीईआरटीने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना स्पष्ट, वाचनीय आणि विद्यार्थ्यांसाठी अनुकूल पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यास परिषद कटिबद्ध असल्याचेही एनसीईआरटीने समाज माध्यमांवर म्हटले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)