एनसीएलटीने दिली फ्यूचर रिटेल लि. विरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्यास मंजुरी

लवादाच्या मुंबई खंडपीठाने विजय कुमार अय्यर यांची अंतरिम रिझोल्युशन प्रोफेशनल यांची नेमणूक केली
एनसीएलटीने दिली  फ्यूचर रिटेल लि. विरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्यास मंजुरी

दि नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल अर्थता एनसीएलटीने फ्यूचर रिटेल लि. विरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी बँक ऑफ इंडियाला मंजुरी दिली. तसेच यासंदर्भातील अशा प्रकारची प्रक्रिया सुरु करण्यास विरोध करणारी ॲमेझॉनची याचिका फेटाळून लावली.

एनसीएलटीच्या या आदेशामुळे फ्यूचर रिटेलविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. कमिटी ऑफ क्रेडिटर्सची नेमणूक करणे, फ्यूचर रिटेल लि. ताब्यात घेण्यासाठी निविदा मागवण्यासाठी समिती नेमण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लवादाच्या मुंबई खंडपीठाने विजय कुमार अय्यर यांची अंतरिम रिझोल्युशन प्रोफेशनल यांची नेमणूक केली आहे. जोपर्यंत रिझोल्युशन प्रोफेशनलची नेमणूक कर्जदार बँक करत नाही, तोपर्यंत अय्यर हे कंपनीच्या कामकाज पाहतील. हा आदेश लवादाच्या खंडपीठाचे न्या. पी. एन. देशमुख आणि सदस्य एस. बी. गौतम यांनी दिला. या आदेशानंतर बँक ऑफ इंडियाचे एनएसईचील शेअरमध्ये १.३ टक्के वाढ होऊन ४८ रुपये झाले. तर फ्यूचर रिटेल लि.च्या समभागात ०.७ टक्का घट होऊन ६.९५ रुपये झाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in