केंद्रीय निवडणूक आयोगाचा दणका; राष्ट्रवादी, तृणमुल काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे
केंद्रीय निवडणूक आयोगाचा दणका; राष्ट्रवादी, तृणमुल काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दणका दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. तसेच, ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षांचाही राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा निर्णय म्हणजे ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांना मोठा दणका मानला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. जानेवारी २०००मध्ये राष्ट्रवादीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. पण, २०१४पर्यंत हा दर्जा कायम होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने पक्षाला नोटिसा पाठवल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, इतर राज्यांमधले अस्तित्व कमी झाल्याने निवडणूक आयोगाने कारवाई केली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमुल काँग्रस हे पक्ष प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखले जाणार आहेत.

तर, दुसरीकडे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in