रालोआ सरकार ४०० पेक्षा अधिक जागा जिंकून सत्तेत येईल; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा विश्वास

आगामी लोकसभा निवडणुकीत रालोआ सरकार ४०० हून अधिक जागा जिंकून पुन्हा सत्तेत येईल
रालोआ सरकार ४०० पेक्षा अधिक जागा जिंकून सत्तेत येईल; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा विश्वास

कोक्राझर : आगामी लोकसभा निवडणुकीत रालोआ सरकार ४०० हून अधिक जागा जिंकून पुन्हा सत्तेत येईल, असा दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी केला. आसाममधील रालोआच्या तीन मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सिंह बोलत होते.

ते म्हणाले की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यास राज्यात एकही कच्चे घर राहाणार नाही. सर्वांना पक्की घरे मिळतील.

केंद्रात आमचे सरकार स्थापन होणार यात अजिबात शंका नाही. माझा विश्वास आहे की रालोआ ४०० पेक्षा जास्त जागा जिंकेल. आसाममधील एनडीएच्या भाजप, एजीपी आणि यूपीपीएल या तीन मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांच्या सभेत ते बोलत होते.

सिंह यांनी असा दावा केला की, केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगाला लोकसभा निवडणुकीचा संभाव्य निकाल माहीत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सरकार स्थापन करणार असल्याचे त्यांनी आधीच मान्य केले आहे.

गरीबांचे जीवनमान सुधारले

ते म्हणाले की, मोदी सरकारने गरीबांचे जीवनमान कमालीचे सुधारले आहे आणि त्यांना काँक्रीट घरे देऊ केली आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in