Neeraj Chopra : भालाफेकपटू नीरज चोप्राची सुवर्ण कामगिरी! जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या भालाफेक या स्पर्धामध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
Neeraj Chopra : भालाफेकपटू नीरज चोप्राची सुवर्ण कामगिरी! जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक

भारताचा गोल्डन बॉय म्हुणून ओळखला जाणाऱ्या नीरज चोप्राने(Neeraj Chopra) 'जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023'च्या(World Athletics Championship ) अंतिम फेरीत इतिहास रचला आहे. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या भालाफेक या स्पर्धामध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. नीरजच्या यशानंतर सगळीकडे त्याचं कौतुक केलं जातं आहे. त्याने या स्पर्धेत यश मिळवल्यानंतर सर्वत्र जल्लोष केला जात आहे. अशातच गावकऱ्यांच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या जल्लोषाचा व्हिडिओ समोर आला आहे. आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे नॅशनल अॅथलेटिक्स सेंटरमध्ये मध्यरात्री हा सामना सुरू झाला होता. त्यात भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्राने 88.17 मीटर भाला फेकून सुवर्णपदक पटकावलं. अंतिम फेरीमध्ये एकूण सहा प्रयत्न झाले असून नीरजने दुसऱ्या फेरीपासून गुणतालिकेत आघाडी कायम ठेवली होती.

नीरजने भालाफेकीत ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्कर तसंच प्रमुख व्यक्तींनी अॅथलीट नीरज चोप्राचे ट्विट करत अभिनंदन केलं आहे. नीरज चोप्राने भारतीय क्रीडा इतिहासात आणखी एक सोनेरी पान जोडलं आहे. नीरजने केलेल्या या कामगिरीमुळे सर्व स्तरातून त्यांच कौतूक केलं जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in