‘नीट पीजी’ परीक्षा ३ ऑगस्टला होणार

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात ‘नीट पीजी’ परीक्षेची तारीख अखेर निश्चित झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा मंडळाने केलेली विनंती मान्य केली असून, ‘पीजी नीट’ परीक्षा ३ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा १५ जून रोजी होणार होती, पण परीक्षा मंडळाने परीक्षा घेण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता.
‘नीट पीजी’ परीक्षा ३ ऑगस्टला होणार
संग्रहित फोटो
Published on

नवी दिल्ली : पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात ‘नीट पीजी’ परीक्षेची तारीख अखेर निश्चित झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा मंडळाने केलेली विनंती मान्य केली असून, ‘पीजी नीट’ परीक्षा ३ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा १५ जून रोजी होणार होती, पण परीक्षा मंडळाने परीक्षा घेण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता.

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. पी. के. मिश्रा आणि न्या. ए. जी. मसीह यांच्या खंठपीठाने हा निर्णय दिला. परीक्षेच्या तारखेत बदल करण्यासंदर्भात याचिकाकर्त्यांनी दिलेल्या उत्तराबद्दल आम्ही समाधानी आहेत, असे न्यायालयाने आदेश देताना सांगितले.

३० मे रोजी दिलेल्या आदेशानुसार परीक्षा घेण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आला आहे. ३ ऑगस्ट २०२५ रोजी परीक्षा घेण्यासाठी ‘एनबीई’ला परवानगी देत आहोत. यापुढे वेळ वाढवून दिला जाणार नाही, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले. याचिकेवरील सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घेण्यास होत असलेल्या विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली होती. तुम्हाला दोन महिने वेळ का हवाय, असा प्रश्नही न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा मंडळाला केला होता.

५०० केंद्रांची गरज

जवळपास २.५ लाख विद्यार्थी आणि ४५० परीक्षा केंद्र आहेत. जर परीक्षा एकाच सत्रात घ्यायची असेल, तर ५०० केंद्राची गरज आहे. त्यामुळे केंद्रांची निवड करणे, सुरक्षेची व्यवस्था करणे आणि विद्यार्थ्यांना केंद्राची निवड करण्यासंदर्भात वेळ लागणार आहे, असे ‘एनबीई’ने कोर्टात सांगितले होते. न्या. पी. के. मिश्रा यांनी मंडळाला ‘तुम्हाला ३ ऑगस्टपर्यंत वेळ हवा आहे. पण, तुम्हाला इतका वेळ का हवा आहे’, असा प्रश्न विचारला होता.

ए. जी. मसीह म्हणाले की, ३० मे रोजी न्यायालयाने आदेश देऊनही तुम्ही अजून प्रक्रिया सुरू केलेली नाही. मग तुम्ही आतापर्यंत काय केले आहे, विलंब होण्यास हेही कारण आहे. तुम्हाला दोन महिन्यांचा वेळ का हवाय, त्यावर ‘एनबीई’ने तांत्रिक कारणे आणि केंद्राची निवड करण्याचा मुद्दा अधोरेखित केला आणि ३ ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्यात येईल, असे सांगितले आणि कोर्टाने त्याला परवानगी दिली.

logo
marathi.freepressjournal.in