NEET-UG Paper Leak : ‘एनटीए’च्या पेटीतून पेपर चोरणाऱ्या मुख्य आरोपीसह दोघांना अटक
प्रातिनिधिक फोटो

NEET-UG Paper Leak : ‘एनटीए’च्या पेटीतून पेपर चोरणाऱ्या मुख्य आरोपीसह दोघांना अटक

अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव पंकजकुमार ऊर्फ आदित्य असे असून तो जमशेदपूरच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतील २०१७ च्या तुकडीतील अभियंता आहे.
Published on

नवी दिल्ली : झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातून ‘एनटीए’च्या पेटीत ठेवलेले ‘नीट-यूजी’चे पेपर चोरणाऱ्या एका मुख्य आरोपीसह सीबीआयने दोन जणांना अटक केली असल्याचे मंगळवारी अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पेपरफुटी आणि अन्य अनियमिततेप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता १४ वर पोहोचली आहे.

अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव पंकजकुमार ऊर्फ आदित्य असे असून तो जमशेदपूरच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतील २०१७ च्या तुकडीतील अभियंता आहे. त्याने हजारीबागमधून ‘एनटीए’च्या पेटीतील ‘नीट-यूजी’चे पेपर चोरले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तो बोकारोचा रहिवासी असून त्याला पाटणा येथून अटक करण्यात आली.

पंकजकुमार याला पेपर चोरण्यासाठी ज्याने मदत केली, त्या राजू सिंह यालाही सीबीआयने अटक केली आहे. राजू सिंह याने चोरलेले पेपर टोळीतील अन्य सदस्यांकडे सुपूर्द केले होते. सिंह याला हजारीबाग येथून अटक करण्यात आली. सीबीआयने याप्रकरणी आतापर्यंत सहा एफआयआर नोंदविले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in