नेपाळमध्ये राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाला ११० जागांवर आघाडी

नेपाळमधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. १६५ जागांसाठीचे प्राथमिक कल आले आहेत. रॅपर आणि काठमांडूचे माजी महापौर बालेन शाह यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने (आरएसपी) तीन जागा जिंकल्या आहेत आणि ११० जागांवर हा पक्ष आघाडीवर आहे.
नेपाळमध्ये राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाला ११० जागांवर आघाडी
नेपाळमध्ये राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाला ११० जागांवर आघाडीPhoto : X
Published on

काठमांडू : नेपाळमधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. १६५ जागांसाठीचे प्राथमिक कल आले आहेत. रॅपर आणि काठमांडूचे माजी महापौर बालेन शाह यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने (आरएसपी) तीन जागा जिंकल्या आहेत आणि ११० जागांवर हा पक्ष आघाडीवर आहे. आरएसपी पक्षाची स्थापना २०२२ मध्ये झाली, तर गगन थापा यांच्या नेपाळी काँग्रेस पक्षाने दोन जागा जिंकल्या आहेत आणि ११ जागांवर तो आघाडीवर आहे. काठमांडूचे महापौर होण्यापूर्वी, बालेन म्हणून ओळखले जाणारे बालेंद्र शाह, बालेन शाह आता पंतप्रधान होण्याच्या मार्गावर आहेत.

भारतविरोधी केपी ओली १०,६४३ मतांनी मागे

त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केल्यानंतर आरएसपीला बरीच लोकप्रियता मिळाली. निवडणूक प्रचारादरम्यान, देशभर प्रवास करताना शाह यांचे स्वागत करण्यासाठी हजारो तरुण जमले होते. केपी शर्मा ओली यांचा कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ देखील ११ जागांवर आघाडीवर आहे. तर केपी ओली हे स्वतः झापा-५ मतदारसंघात शाह यांच्यापेक्षा १०,६४३ मतांनी मागे आहेत. ओली यांनी २०१७ आणि २०२२ च्या निवडणुकीत झापा-५ मतदारसंघातून विजय मिळवला होता.

सोमवार पर्यंत मतमोजणी होईल पूर्ण

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर गुरुवारी झालेल्या निवडणुकीत ६०% पेक्षा जास्त मतदारांनी मतदान केले. मतमोजणीला तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता आहे. येत्या सोमवारी ९ मार्चपर्यंत मतमोजणी पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जातील असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

logo
marathi.freepressjournal.in