नेस्लेच्या चौकशीचे सरकारचे आदेश

नेस्लेचे सेरेलॅक हे गहू-आधारित उत्पादन सहा महिन्यांच्या बाळांसाठी ब्रिटन आणि जर्मनीमध्ये कोणत्याही साखरेशिवाय विकले जाते. परंतु, भारतात...
नेस्लेच्या चौकशीचे सरकारचे आदेश
Published on

नवी दिल्ली : भारतातील केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला (एफएसएसएआय) नेस्ले कंपनीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ‘पब्लिक आय’ आणि ‘इंटरनॅशनल बेबी फूड अॅक्शन नेटवर्क’ या स्वित्झर्लंडमधील स्वयंसेवी संस्थेने नुकताच असा दावा केला होता की, नेस्ले कंपनी भारतात विकत असलेल्या लहान मुलांच्या खाद्यपदार्थांमध्ये नियमांपेक्षा अधिक साखर असते. त्याची दखल घेऊन भारतात नेस्लेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

नेस्लेने युरोपमधील बाजारपेठांच्या तुलनेत भारत, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील देशांत साखरेचे प्रमाण अधिक असलेली लहान मुलांसाठीची उत्पादने विकली, असे स्विस स्वयंसेवी संस्थेने म्हटले होते. नेस्लेचे सेरेलॅक हे गहू-आधारित उत्पादन सहा महिन्यांच्या बाळांसाठी ब्रिटन आणि जर्मनीमध्ये कोणत्याही साखरेशिवाय विकले जाते. परंतु, भारतात सेरेलॅकमध्ये साखर मिसळलेली असते, असा दावा करण्यात आला आहे. त्यावर नेस्ले इंडियाने सांगितले होते की, ते नियमांच्या पालनाबाबत कधीही तडजोड करत नाहीत आणि गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी भारतातील बेबी फूड उत्पादनांमध्ये साखरेचे प्रमाण ३० टक्क्यांनी कमी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in