मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावरून नवा वाद; पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, भारताने पाकचा आदर केला पाहिजे

पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे त्यामुळे भारताने त्या देशाचा आदर केला पाहिजे, एखादा माथेफिरू सत्तेवर आला तर तो त्याचा आपल्यावर वापर करू शकतो, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावरून नवा वाद; पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, भारताने पाकचा आदर केला पाहिजे

नवी दिल्ली : पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे त्यामुळे भारताने त्या देशाचा आदर केला पाहिजे, एखादा माथेफिरू सत्तेवर आला तर तो त्याचा आपल्यावर वापर करू शकतो, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेस पक्षाने तातडीने अय्यर यांच्या विधानाबाबत कानावर हात ठेवले आहेत, तर भाजपने त्यावर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, मणिशंकर अय्यर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो जुना असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष पवन खेरा यांनी परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांचा व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यामध्ये जयशंकर हे भारताने चीनला घाबरून राहावे,असे वक्तव्य करीत असल्याचे दिसत आहे, असे खेरा म्हणाले.

दरम्यान, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी काँग्रेसवर टीका करताना स्पष्ट केले आहे की, नवा भारत देश कोणलाही घाबरत नाही, काँग्रेस नेते राहुल गांधी पाकिस्तानसमोर नतमस्तक होऊन त्यांचा आणि त्यांच्या दहशतवादाचा बचाव करीत आहेत, असे चंद्रशेखर म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in