कर्नाटकात आज नवे सरकार स्थापन ; सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
कर्नाटकात आज नवे सरकार स्थापन ;  सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

कर्नाटकात आज नवे सरकार स्थापन झाले आहे. कर्नाटकातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाची तर कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर आता या पक्षाने राज्यात सरकार स्थापन केले आहे. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. काँग्रेस विधिमंडळ पक्षाने गुरुवारी औपचारिकपणे सिद्धरामय्या यांची नेता म्हणून निवड केली. त्यानंतर त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. दरम्यान, आज (20 मे) बंगळुरू येथील कांतिरवा मैदानावर शपथविधी सोहळा पार पडला. सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.

दरम्यान, या शपथविधी सोहळ्यापूर्वी काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि डी.के.शिवकुमार यांनी दिल्लीत जाऊन मंत्रिमंडळ निर्मिती आणि खातेवाटप यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचीही भेट घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा आणि काँग्रेस आमदार प्रियांक खर्गे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. सिद्धरामय्या, शिवकुमार आणि खर्गे, के.एच. मुनियप्पा, के.जे. जॉर्ज आणि एम.बी. पाटील यांच्याशिवाय, नव्याने निवडून आलेल्या कर्नाटक सरकारमध्ये तीन नेत्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पाटील हे कर्नाटकातील लिंगायत समाजाचे प्रमुख नेते आहेत. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी या तिन्ही मंत्र्यांना शपथ दिली. तसेच काँग्रेसचे आमदार जी.परमेश्वर यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in