जीएसटीचे नवे दर आजपासून आकारण्यात येणार; पीठ, पनीर आणि दहीसारखे खाद्यपदार्थ महागणार

हॉटेलचे प्रतिदिवसाचे भाडे एक हजार रुपये असणाऱ्या खोल्यांवर १२ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे.
जीएसटीचे नवे दर आजपासून आकारण्यात येणार; पीठ, पनीर आणि दहीसारखे खाद्यपदार्थ महागणार
Published on

जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) परिषदेच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर सोमवारपासून अनेक खाद्यपदार्थ महाग होणार आहेत. यामध्ये पीठ, पनीर आणि दही यांसारख्या प्री-पॅकेज्ड आणि लेबल केलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश असून, त्यावर पाच टक्के जीएसटी लागू होईल. त्याचबरोबर पाच हजार रुपयांपेक्षा जास्त भाडे घेणाऱ्या हॉस्पिटलच्या खोल्यांवर आणि हॉटेलचे प्रतिदिवसाचे भाडे एक हजार रुपये असणाऱ्या खोल्यांवर १२ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्यात झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत कॅन, पॅकेज आणि लेबल केलेले मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुके सोयाबीन, मटार यांसारखी उत्पादने तसेच गहू, इतर अन्नधान्य व तांदूळ यावर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे, टेट्रा पॅक आणि बँकेद्वारे जारी केलेल्या धनादेशांवर १८ टक्के जीएसटी आणि अॅटलससह नकाशे आणि चार्टवर १२ टक्के जीएसटी आकारला जाईल. तसेच उघड्यावर विकल्या जाणाऱ्या; पण ब्रँड नसलेल्या उत्पादनांवर जीएसटी सूट कायम राहील.

logo
marathi.freepressjournal.in