
नवी दिल्ली : नवीन प्राप्तिकर कायद्याचे विधेयक पुढील आठवड्यात संसदेत मांडले जाणार आहे. तत्पूर्वी हे विधेयक शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडले जाण्याची शक्यता आहे.
केंद्रीय अर्थ सचिव तुहीन कांता पांडे म्हणाले की, या नवीन विधेयकात मोठी वाक्य, तरतुदी व स्पष्टीकरण नसतील. नवीन विधेयक पुढील आठवड्यात सादर होईल. मात्र, हे विधेयक वेगळे असेल. नवीन कायदा सोपा असेल. कायदे म्हणजे केवळ तो कायदा क्षेत्रातील तज्ज्ञांना समजावा असे नाही. तो नागरिकांना समजला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
नवीन प्राप्तिकर विधेयक हा ६० वर्षं जुन्या प्राप्तिकर कायद्याची जागा घेणार आहे. या नवीन कायद्याबाबत शुक्रवारी मंत्रिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे.