चहा कशाला म्हणायचे? नवीन व्याख्या जाहीर; ‘हर्बल, फ्लॉवर टी’ला चहा म्हणणे बेकायदेशीर

भारतीयांचे सर्वात आवडते पेय म्हणजे चहा. सकाळी किंवा दुपारनंतर प्रत्येक घरात आवडीने पितात तो म्हणजे चहा. चहा प्यायलाशिवाय भारतीयांना ताजेतवाने वाटतच नाही. आता चहाच्या नावाखाली अनेक जण आयुर्वेदिक चहा विकण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्राने आता चहाची व्याख्या बदलली असून हर्बल टी विकणाऱ्यांना दट्ट्या दिला आहे.
चहा कशाला म्हणायचे? नवीन व्याख्या जाहीर;  ‘हर्बल, फ्लॉवर टी’ला चहा म्हणणे बेकायदेशीर
चहा कशाला म्हणायचे? नवीन व्याख्या जाहीर; ‘हर्बल, फ्लॉवर टी’ला चहा म्हणणे बेकायदेशीर
Published on

नवी दिल्ली : भारतीयांचे सर्वात आवडते पेय म्हणजे चहा. सकाळी किंवा दुपारनंतर प्रत्येक घरात आवडीने पितात तो म्हणजे चहा. चहा प्यायलाशिवाय भारतीयांना ताजेतवाने वाटतच नाही. आता चहाच्या नावाखाली अनेक जण आयुर्वेदिक चहा विकण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्राने आता चहाची व्याख्या बदलली असून हर्बल टी विकणाऱ्यांना दट्ट्या दिला आहे.

भारताच्या खाद्य सुरक्षा व मानक प्राधिकरणाने (एफएसएआय) सांगितले की, ‘कॅमेलिया सिनेसीस’ या वनस्पतीपासून बनवणाऱ्या उत्पादनालाच चहा संबोधले जाऊ शकते. तसेच या वनस्पतीशिवाय बनणाऱ्या कोणत्याही उत्पादनाला ‘चहा’ संबोधणे बेकायदेशीर ठरवले आहे. ‘हर्बल, ग्रीन टी’ला चहा संबोधून त्याचे मार्केटिंग केल्यास ती जाहिरात फसवणूक समजली जाईल.

२४ डिसेंबर रोजी जारी केलेल्या या निर्देशानुसार, ‘रुईबॉस टी’, ‘हर्बल टी’ आणि ‘फ्लॉवर टी’ अशा नावांनी बाजारात विकल्या जाणाऱ्या काही उत्पादनांचा ‘एफएसएसएआय’ने आढावा घेतला. ही उत्पादने ‘कॅमेलिया सायनेन्सिस’ या वनस्पतीपासून तयार झालेली नसतानाही ‘चहा’ म्हणून विकली जात असल्याचे निदर्शनास आले.

केवळ कॅमेलिया सायनेन्सिसपासून तयार झालेल्या पेयांनाच पॅकेजिंग आणि लेबलिंगवर ‘चहा’ हा शब्द वापरण्याची परवानगी आहे. यामध्ये कांगडा चहा, ग्रीन टी आणि इन्स्टंट टी यांसारख्या प्रकारांचा समावेश होतो.

ई-कॉमर्ससह उत्पादन, पॅकिंग, विपणन, आयात किंवा विक्री करणाऱ्या सर्व अन्न व्यवसाय चालकांनी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश एफएसएसएआयने दिले आहेत. ‘कॅमेलिया सायनेन्सिसपासून न बनवलेल्या कोणत्याही उत्पादनासाठी थेट किंवा अप्रत्यक्षरीत्या ‘चहा’ हा शब्द वापरणे टाळावे,’ असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

तसेच, राज्यस्तरीय अधिकाऱ्यांना ऑनलाइन विक्रेत्यांसह सर्व अन्न व्यवसाय चालकांकडून या तरतुदींची कडक अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in