नववर्षाची सुरुवात पावसाने

३० डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान तामिळनाडूतील किनारपट्टीवरील भागात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नववर्षाची सुरुवात पावसाने

मुंबई : अनेकांनी थर्टी फर्स्टचे प्लान ठरवले असतीलही. पण वर्षअखेरीस आणि नवीन वर्षाच्या स्वागत पावसाने करावे लागण्याची शक्यता आहे. आता पुन्हा वर्षअखेर आणि नवीन वर्षात पावसाची शक्यात हवामान विभागाने वर्तवली आहे.

३० डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान तामिळनाडूतील किनारपट्टीवरील भागात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, गोवा, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा बेत आखत असाल तर सोबत स्वेटर आणि छत्रीही न्यायला विसरू नका.

पश्चिम राजस्थान, पश्चिम मध्यप्रदेश, पश्चिम उत्तरप्रदेशचा काही भाग,  दिल्ली आणि एनसीआर मध्ये पावसाची शक्यता आहे. डोंगराळ भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशात २६ते२९ डिसेंबर या काळात दाटते अतिदाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे. तर पुढील ४ दिवस हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, हरियाणा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मध्येप्रदेश, गुजरात, राजस्थान ,महाराष्ट्रआणिगोव्यासहआसपासच्याभागातदाटधुकेराहील

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in