
मुंबई : वाहनांच्या समोरील काचेवर दर्शनी भागावर फास्टॅग न लावणे वाहन चालकांना चांगलेच महागात पडणार आहे. महामार्गावर प्रवास करताना टोल नाक्यांवर फास्टॅग हातात घेऊन दाखविणाऱ्या वाहनचालकांचे फास्टॅग काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) लागू केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या वाहन चालकांना मोठा फटका बसणार आहे.
महामार्गावर प्रवास करताना अनेक वाहन चालक फास्टॅग वाहनाच्या समोरील काचेवर न चिकवता, वाहनचालक ते हातात घेऊन टोल स्कॅनरसमोर दाखवतात. यामुळे टोल भरण्याचा वेळ लागून टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबच्या रांगा लागतात. त्यामुळे नवीन नियमानुसार वाहनांच्या दर्शनी भागावर फास्टॅग न लावणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल.
टोल नाक्यावर फास्टॅग हातात धरून स्कॅन करण्याचा आग्रह करणाऱ्या वाहन चालकांमुळे इतर प्रवाशांची गैरसोय होते. हे टाळण्यासाठी वाहनांच्या समोरील काचेवर फास्टॅग न लावणारे फास्टॅग काळ्या यादीत टाकण्यात येणार आहेत.