कॅनडात ठार झालेला खलिस्तानी नेता हरदीप सिंह निज्जर यांच्या पंजाबमधील घराची जप्ती करण्याचे आदेश राष्ट्रीय तपास पथकाच्या कोर्टाने दिले आहेत. त्यानुसार त्याच्या घरावर जप्तीची नोटीसही चिकटवण्यात आली आहे. एएनआय या वृत्त संस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
कॅनडाच नागरिकत्व घेतलेल्या हरदीप सिंह निज्जर हा कॅनडात राहून खलिस्थान समर्थन करत दहशत वादी कारवाया कारवाया करत होता. कॅनडात त्याची हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येवरुन भारत आणि कॅनडा या दोन्ही देशाचे संबंध ताणले गेले. दोन्ही देशात यावरुन आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया सारख्या देशांनी यात कॅनडाची बाजू घेतल्याने हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चिला जात आहे.
दरम्यान भारत निज्जर प्रकरणात आपल्या भूमिकेत ठाम असून आता निज्जरच्चा कुंटुंबावर देखील कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार, मोहाली इथल्या एनआयए कोर्टाच्या आदेशानुसार, हरदीपसिंह निज्जरच्या जालंधर जिल्ह्यातील भारसिंहपुरा गावातील घरावर जप्तीची नोटीस चिकटवण्यात आली आहे.
हरदीपसिंह निज्जर कोण आहे?
हरदीप सिंह निज्जर हा खलिस्तानी चळवळीचा नेता अशून त्याने कॅनडाचं नागरिकत्व स्विकारलं होतं. त्याची कॅनडात एका गुरुद्वराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी त्यांच्या संसदेत केला होता. भारताने देखील तात्काळ ट्रूडोंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं होतं.
यानंतर कॅनडाने भारताच्या दुतावासाची हकालपट्टी केली होती. भारताने देखील कॅनडाच्या उच्चाधिकाऱ्यांनी हकालपट्टी करत त्यांना पाच दिवसांत भारत सोडण्याचे आदेश दिले होतं. दरम्यान, कॅनडाला निज्जरच्या हत्येची बातमी अमेरिकेनं दिल्याची नवी माहिती कॅनडियन माध्यमांच्या रिपोर्टिंगमधून समोर आली आहे. त्यामुळे अमेरिका देखील भारतासोबत डबल गेम खेळत असल्याच्या देखील चर्चा सध्या सुरु आहेत.